Nagesh Jadhav Sir | Dnyaneshwar Pimpaldhawkar talks about Nagesh Jadhav Sir

बंदुकीच्या धाकावर हंटर च्या जोरावर बदल घडवणारे मी अनेक माणसं बघितली बंदूक जवळ असून सुद्धा बंदुकीच्या दाखा शिवाय आणि हंटर च्या जोरा शिवाय आपल्या अधिकाराचा,कोशल्याचा, धोरणात्मक निर्णयाने नवनवीन संकल्पना घेऊन जाईल त्या पोलीस स्टेशनमध्ये तेथील काया पालट, परिवर्तन घडवून आनणारे…वाघ…मी पाहिला ते म्हणजे आदरणीय पोलीस उप आयुक्त आमचे काका श्री नागेश जाधव साहेब आषाढी निमित्त कालच पंढरपूरची वारी संपली आहे त्याच भाषेमध्ये पोलीस विभागातील आमच्या..विठ्ठला…बद्दल वाढदिवसा निमित्त दोन शब्द लिहिण्याचा प्रयत्न करतो.


काका साहेबा बद्दल काय लिहावं या विभागात अनेक पोलीस अधिकारी झाले पण आपल्या अधिकाराचा वापर करून जनतेपर्यंत, गोरगरीब कष्टकरी आदिवासी यांच्यासाठी विभागामार्फत काय करता येईल आपलं सर्वस्व पणाला लावून,बुद्धिमत्ता, कौशल्य, नवीन संकल्पना राबवून खर अधिकारी ही ब्रीदवली तंतोतंत ज्यांना लागू पडते ते अधिकारी म्हणजे श्री नागेश जाधव साहेब वरून काटेरी फणसासारखे आतून तितकीच गोड डॅशिंग, जिद्दीचे महामेरू अधिकारी युवा वर्गाचे आयडॉल एक उत्तम जानकार,अभ्यासू, दबंग व शिस्त कोशल्या समर्पित अत्यंत प्रभावशाली व मुत्सद्दी नेतृत्व गुण असणारे पेच प्रसंगामध्ये तोडगा काढून कधीही वैयक्तिक महत्त्वकाशा बाळगली नाही नेहमी व्यापक जनहित डोळ्यासमोर ठेवून जीवनाला नेहमी सकारात्मक चष्म्यातून पाहुन नवे काहीतरी करण्याची मानसिक तयारी असेल तर दुर्दम इच्छाशक्तीच्या बळावर कोणत्याही परिस्थितीवर मात करत यशाची शिखरे कशी सर करावी हे काकासाहेब कडून शिकवन मिळते काका साहेब जेवढे स्वभावाने आक्रमक आहेत तेवढ्याच पटीने जास्त पोलीस विभागामध्ये दरारा आणि सर्वांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी तितकेच प्रेमळ व चांगल्या कामासाठी पाठीवर थाप देऊन मनोबल वाढवणारे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते, आहेत, राहतील
आपल्या जबाबदारी विषयी कटिबद्धता पोलीस स्टेशनचा कारभार चालवण्याची विलक्षण कला, टापटीप राहणीमान संयमी मुद्देसूद एखाद्या समस्यावर योग्य ते संभाषण करून वरिष्ठ स्तरावर पटवून देणे योग्य ते पर्याय शोधून सर्वाना समान न्याय देणारे असे आपले अनेक गुण प्रत्येकाच्या मनाला भावणारे आहेत.


पोलीस स्टेशनचे प्रमुख कसे असावे, आतापर्यंत जिथे आपली सेवा झाली त्या ठिकाणी बदल करून मुंबई पोलीस विभागाची प्रतिमा उंचवण्याचा काम आपण केलात मी भाग्यवान आहे आपलं सारख्याच मार्गदर्शन,आशीर्वाद, पोलीस स्टेशन माझ्या कार्यालया जवळ असल्याने सानिध्यात राहता आले नेहमी तुमच्याकडून पॉझिटिव्ह एनर्जी, नवीन काहीतरी करण्याचा ध्यास मी प्रत्यक्ष प्रत्यक्षपणे आपल्या कडून शिकत असतो काका.


आपले पोलीस विभागातील कार्य आपल्या नावाची रुबाबता दीर्घकाळ सर्वांच्या स्मरणात राहणार आहे ती तुम्ही सेवानिवृत्त झाल्यानंतर तुमची रुबाबता आम्ही पाहतच असतो आणि यापुढे आपल्या कार्याची ख्याती, उत्कृष्ट कार्याची शिदोरी, प्रसिद्धी, वाढत राहो या पुढील आयुष्य प्रर्वासाठी आपणास शिवनेरीची श्रीमंती,रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता,सह्याद्रिची उंची, लाभो हीच बुद्ध चरणी प्रार्थना फुले शाहू आंबेडकर यांच्या कृपेने आपणास उदंड आयुष्य मिळो आपल्यातील वोलावा तुमचे आशीर्वाद, प्रेम, मार्गदर्शन आमच्यावर असेच राहो सतत तुमचा स्नेहा मिळत रहावा या सदिच्छांसह आपणास उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य लाभो वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा आदरणीय गुरुवर्य श्री नागेश जाधव साहेब (काकाश्री) 💐🎂🙏


तुमचाच
ज्ञान दा (ज्ञानू )
ज्ञानेश्वर कंदेवाड पिंपळढवकर

Nagesh Jadhav
Nagesh Jadhav
Articles: 15

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *